पर्रिकरांचा 'तो' दौरा राजकीय स्टंट नाही - भाजप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकताच उड्डाणपुल निरीक्षणाचा दौरा केला. हा दौरा म्हणजे राजकीय स्टंटबाजी नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने गोव्यात नुकतीच जनआक्रोष रॅली काढली. तसेच सरकार बदलण्याचे आवाहन केले. त्यानंतर भाजपची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस मनोहर पर्रिकर यांच्या आरोग्यावरूनही राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने लावला आहे. भाजपचे सरचिटणीस सदानंद तानवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा समाचार घेतला. 

गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यावर काँग्रेस विविध प्रकारची निदर्शने करत आहे. त्याने काहीही होणार नाही, कारण लोकांच्या मनात पर्रिकरांविषयी आदर आहे असे तानवडे यांनी म्हटले आहे. पर्रिकरांनी राज्याला काय योगदान दिले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे, काँग्रेसने पर्रिकरांच्या आरोग्यावर राजकारण करणे बंद करावे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या बांधकाम सुरू असलेल्या गोव्यातील दोन ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर त्यांचे फोटो रविवारी समोर आले. त्यावरूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु झाल्या.

Web Title: Manohar Parrikar's Bridge Inspection "No Stunt": BJP