esakal | भाजप सरकारचे समर्थन काढून घेणाऱ्या अपक्ष आमदाराच्या घरावर आयकर विभागाचे छापे

बोलून बातमी शोधा

raid }

आयकर विभागाने गुरुवारी हरियाणाच्या महममधील अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या घरासह ३० पेक्षा जास्त ठिकाणावर एकाचवेळी छापा टाकला आहे.

भाजप सरकारचे समर्थन काढून घेणाऱ्या अपक्ष आमदाराच्या घरावर आयकर विभागाचे छापे
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

चंदीगड- आयकर विभागाने गुरुवारी हरियाणाच्या महममधील अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या घरासह ३० पेक्षा जास्त ठिकाणावर एकाचवेळी छापा टाकला आहे. आयकर विभागाच्या टीमने आज सकाळी रोहतकच्या सेक्टरमध्ये असलेल्या त्यांच्या घरावर आणि गुरुग्राममधील घरावर छापा टाकला आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या माहेरी हिसारच्या हांसीमध्ये आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तसेच त्यांचे व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरी छापेमारी झाली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

'Work From Home पुरे, ऑफिसला या'; कंपनीच्या मेलनंतर तरुणीची...

बलराज कुंडू यांनी २०१९ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढली होती. त्यावेळी भाजपने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला होता. कुंडू यांनी भाजप उमेदवार समशेर सिंह यांना हरवलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद सिंह दांगी यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मनोहरलाल खट्टर सरकारला समर्थन दिले होते, पण मागील वर्षी त्यांनी खट्टर सरकारचे समर्थन वापस घेतले होते. 

आलिशान फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट; महिला दलालास अटक, तरुणीची सुटका

विशेष म्हणजे अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी उघडपणे तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. तसेच ते अनेक शेतकरी महापंचायतच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यांनी मागील वर्षी माजी सहकार मंत्री मनीष ग्रोवर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. पण, खट्टर सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी सरकारचे समर्थन वापस घेतले होते. कुंडू यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे ते सरकारचे समर्थन काढून घेत आहेत.