IMAगैरव्यवहारातील आरोपी मंसूर खानला अटक; 1750 कोटींची लाच दिल्याची कबुली

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

IMAचा संस्थापक मालिक मोहम्मद मंसूर खान (Mansoor Khan)ला ईडी (Enforcement Directorate)कडून आज (ता.05) अटक करण्यात आली. खानला दुबईवरून परतत असतानाच नवी दिल्ली विमानतळावर रात्री उशिरा पावनेदोनच्या सुमारास अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : IMAचा संस्थापक मालिक मोहम्मद मंसूर खान (Mansoor Khan)ला ईडी (Enforcement Directorate)कडून आज (ता.05) अटक करण्यात आली. खानला दुबईवरून परतत असतानाच नवी दिल्ली विमानतळावर रात्री उशिरा पावनेदोनच्या सुमारास अटक करण्यात आली.

ईडीने खानच्या विरोधात याआधी नोटीस जारी केली होती आणि चौकशीला सामोरे जाण्याचेही सांगितले होते. मंसूर खानने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने स्पष्ट केले होते की, तो 24 तासांच्या आत भारतात परत येईल. आपण भारतातून पलायन करण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटले होते.

खानने पोलिस सुरक्षेची मागणी करताना म्हटले होते की, माझा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून माझा भारत सोडण्याचा निर्णय हा चुकीचा होता. खानला आता 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूण 1750 कोटी रुपये आपण लाचेखातर दिला असल्याचा दावा मंसूर खानने केला असून याबाबत विशेष तपास पथकासमोर अधिकृत खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. राजकारणी लोकांना जवळपास 400 कोटी तर आणखी काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना काही कोटीमध्ये लाच दिली असल्याचे मंसूर खान कडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत अधिकृत नावेही तो जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, राजकारण्यांच्या शाही लग्नाखातरही त्याने पैसे खर्च केले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यामध्ये कोणाकोणाची नावे गोवली जाणार आणि कोणा-कोणाची नावे यामध्ये आहेत यावर सर्वांचे लक्षन लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mansoor Khan in SIT custody till Aug 16