धक्कादायक ! वायू प्रदूषणामुळे भारतात होतात 'एवढे' मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : मागील दीड वर्षांपासून वायू प्रदूषणाची समस्या बिकट होत आहे. या एक-दीड वर्षांच्या कालावधीत अनेक भारतीयांना आपला जीव गमावला आहे, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. हवा प्रदूषणरहित असल्यास मानवाचे जीवनमान अधिक जास्त राहू शकेल, असे शास्त्रज्ञानांनी सुचवले. 

या वायूप्रदूषणाबाबतचा हा पहिला अहवाल जारी करण्यात आला असून, वायू प्रदूषण आणि त्यानंतरचे माणसाचे जीवनमान या दोन्ही विषयांचा अभ्यास करण्यात आला आहे. ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी बाहेरील वायू प्रदूषणावर अभ्यास करून सांगितले, की 2.5 पर्टीक्युलेट मॅटरपेक्षा (पीेएम) कमी नसेल. पर्टीक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 वायू प्रदूषण कार, ट्रक, आग, औद्योगिक वसाहतींमधून निर्माण होत आहे. 

बांग्लादेश, इजिप्त, पाकिस्तान, सौदी अरेबिया, नायजेरिया आणि चीन या देशांत मागील काही वर्षांत वायू प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. भारतातील सुमारे दहा लाख लोक या वायू प्रदूषणामुळे प्रतिवर्षी मृत्यू पावले आहेत, अशी माहिती पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान मासिकाचे जोशुआ आपटे यांनी दिली.

Web Title: Many deaths due to air pollution in the last one and a half years