
अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येचे स्वरूप भव्य तर होईलच शिवाय येथील अर्थ व्यवस्थेतही बदल होईल, असे भाषणात सांगितले होते. त्यानुसार मंदिर बांधून झाल्यावर येथे काय सुधारणा होतील, अयोध्येचे स्वरूप कसे असेल, पर्यटनवाढ आणि अयोध्यावासींना लाभ कशा प्रकारे होणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
अयोध्या - अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येचे स्वरूप भव्य तर होईलच शिवाय येथील अर्थ व्यवस्थेतही बदल होईल, असे भाषणात सांगितले होते. त्यानुसार मंदिर बांधून झाल्यावर येथे काय सुधारणा होतील, अयोध्येचे स्वरूप कसे असेल, पर्यटनवाढ आणि अयोध्यावासींना लाभ कशा प्रकारे होणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
धार्मिक पर्यटनाला महत्त्व
भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात पर्यटन क्षेत्रातील उलाढाल २०१७ मध्ये १५.२४ लाख कोटी रुपये होती. ती २०२८ पर्यंत ३२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात सर्वाधिक वाटा हा देशांतर्गत पर्यटनाचा आहे. त्यातही धार्मिक पर्यटन ६० टक्के असून त्यातून सुमारे दहा लाख कोटी रुपये उत्पन्न मिळते.
अयोध्येतील विकासकामे
अयोध्येतील पर्यटन
राम मंदिर उभारल्यानंतर अयोध्येत दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येतील, असे मत मंदिराचे मुख्य रचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांचे पुत्र वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच वर्षाला ३.६ कोटी लोक अयोध्येला भेट देतील.
Edited By - Prashant Patil