छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

बिजापूर जिल्हयातील भोपालपटनम गावात सोमवारी रात्री आठ वाजता पंचायत समिती सदस्य जगदीश कोन्ड्रा आपल्या मित्रासोबत घरासमोर बसलेले असताना पाच माओवाद्यांनी घेराव करून कुऱ्हाड व चाकुने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे नेत असताना रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.  

बिजापूर : महाराष्ट्राच्या सीमेपासुन पाच किलोमीटर अंतरावर छत्तीसगडचे भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य जगदीश कोन्ड्रा यांची माओवाद्यांनी सोमवारी रात्री हत्या केली.

बिजापूर जिल्हयातील भोपालपटनम गावात सोमवारी रात्री आठ वाजता पंचायत समिती सदस्य जगदीश कोन्ड्रा आपल्या मित्रासोबत घरासमोर बसलेले असताना पाच माओवाद्यांनी घेराव करून कुऱ्हाड व चाकुने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे नेत असताना रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.  

जगदीश कोन्ड्रा हे आठ वर्षांपूर्वी कंत्राटदाराचे काम करीत होते. माओवाद्यांनी यांना धमकी दिली होती. त्यानंतर यांनी कंत्राटदाराचे काम सोडले. जगदीश कोन्ड्रा माजी जिल्हा परिषद सदस्य होते. सध्या पंचायत समिती सदस्य होते. त्यांच्या मागे दोन मुली, पत्नी असे कुटुंब असुन आपल्या भावाचा कुंटुबाची जबाबदारी सांभाळत होते. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय आधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Maoist killed BJP leader jagdish Kondra in Chattisgarh