माओवादी नेता 'आरके' सुरक्षित असल्याचा दावा

आर. एच. विद्या
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

हैदराबाद - माओवादी नेता रामकृष्ण ऊर्फ "आरके' हे सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी ते नेमके कोठे आहेत, याचा निश्‍चित ठावठिकाणा समजत नसल्याने त्यांच्याबाबतचे गूढ वाढत चालले आहे. रामकृष्ण सुरक्षित असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असे क्रांतिकारी लेखक वरावरा राव यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, ते कोठे आहेत आणि ही माहिती त्यांना कोणी दिली हे मात्र वरावरा राव यांनी जाहीर केलेले नाही. त्यांचा शोध घेण्याच्या निमित्ताने गिरीजन परिसरातील लोकांना पोलिसांनी अनावश्‍यक त्रास देऊ नये, त्यांचा छळ करू नये, असे आवाहनही राव यांनी पोलिसांना केले आहे.

विशेष म्हणजे आपले पती पोलिस कोठडीत असून, त्यांच्या जिवाची आपल्याला काळजी असल्याने न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावी, अशी मागणी करणारी याचिका रामकृष्ण यांच्या पत्नीने मागे घेतली आहे. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली आहे. या सुनावणीवेळी रामकृष्ण हे पोलिस कोठडीत नसल्याचे निवेदन विशाखापट्टणच्या पोलिस आयुक्तांनी न्यायालयात सादर केले. वरावरा राव यांच्या माहितीनंतर रामकृष्ण यांच्या ठावठिकाण्याबाबत अशा वेगाने घटना घडल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.

Web Title: maoist leader secure