नक्षलवादी महिलेस छत्तीसगडमध्ये अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बालमती कोरम (वय 21) या नक्षलवादी महिलेला सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने चित्तपाणी गावातील जंगलातून अटक केली, असे कोंडागावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक माहेश्‍वर नाग यांनी सांगितले

रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील ज्या नक्षलवादी महिलेवर तीन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, तिला कोंडागावमध्ये मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बालमती कोरम (वय 21) या नक्षलवादी महिलेला सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने चित्तपाणी गावातील जंगलातून अटक केली, असे कोंडागावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक माहेश्‍वर नाग यांनी सांगितले. जिल्हा राखीव दल व स्थानिक पोलिसांनी एकत्र नक्षलवादाविरोधात मोहिम सुरू केली आहे.

फेब्रुवारी 2015 मध्ये हदेली गावातील पोलिस पथकावर झालेल्या हल्ल्यात बालमती कोरम हिचा हात असल्याने तिला शोध घेण्यासाठी तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Web Title: maoist woman arrested