नक्षलवादी हल्ल्यात जवान हुतात्मा

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

इटानगर - अरुणाचल प्रदेशात असाम रायफल्सच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी आज अचानक केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील वक्का गावाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. भारत-म्यानमार सीमेपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी 16 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अचानक हल्ला चढवला. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात एक जवान जागेवरच हुतात्मा झाला असून, नऊ जण जखमी झाल्याची माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल चिरंजित कोंवर यांनी दिली. हल्ला कुठल्या संघटनेने केला याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

इटानगर - अरुणाचल प्रदेशात असाम रायफल्सच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी आज अचानक केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील वक्का गावाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. भारत-म्यानमार सीमेपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी 16 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अचानक हल्ला चढवला. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात एक जवान जागेवरच हुतात्मा झाला असून, नऊ जण जखमी झाल्याची माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल चिरंजित कोंवर यांनी दिली. हल्ला कुठल्या संघटनेने केला याचा खुलासा करण्यात आलेला नाही. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

अनधिकृत वृत्तानुसार आसाम रायफल्सच्या ताफ्यावर "एनएससीएन-के' आणि "उल्फा'च्या नक्षलवाद्यांनी संयुक्तपणे हल्ला केल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Maoists attack to jawan martyr