छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेच होते, असे कोडगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पणाच्या धोरणाने आपण प्रभावित झालो आहोत

रायपूर - छत्तीसगडच्या कोडगाव जिल्ह्यात आज (सोमवार) दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेच होते, असे कोडगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पणाच्या धोरणाने आपण प्रभावित झालो आहोत. आत्मसमर्पण केलेल्या दहा नक्षलवाद्यांमध्ये जानमिलितीआचा कमांडर विकास सालाम याचाही समावेश होता, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Web Title: maoists chhattisgarh surrender