छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

पीटीआय
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

आज सकाळी साडेसातच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पथकावर गोळीबार केला. त्यावेळी कमांडोनी त्यांनी प्रत्युतर दिल्याने नक्षलवादी पळून गेले. मात्र गणवेशातील दोन नक्षलवादी ठार झाले, असे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले

रायपूर (छत्तीसगड) - सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. ही घटना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात घडली.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या "कोब्रा' पथकाची 204 वी बटालियन आणि जिल्हा राखीव दलाच्या संयुक्त पथकाने काल रात्रीपासून मुदुवंडी- कवाडगाव जंगलात नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू केली आहे. आज सकाळी साडेसातच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पथकावर गोळीबार केला. त्यावेळी कमांडोनी त्यांनी प्रत्युतर दिल्याने नक्षलवादी पळून गेले. मात्र गणवेशातील दोन नक्षलवादी ठार झाले, असे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

Web Title: Maoists killed in Chhattisgarh