छत्तीसगडमध्ये 6 स्फोट; चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये 6 स्फोट; चकमकीत एक नक्षलवादी ठार

कांकेर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील कोयली बेडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडीचे 6 स्फोट घडवून आणले. यामध्ये सीमा सुरक्षा दलातील (बीएसफ) एक जवान जखमी झाला. या नक्षलवाद्यांनी कोयली बेडा भागात आयईडीचे सीरीज प्लांट केले होते. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात बीएसएफला यश आले.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता.12) मतदान होत आहे. नक्षल प्रभावित भागांत हा पहिला टप्पा होत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही तासांपूर्वी या भागात आयईडीचे 6 स्फोट झाले. या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिमेत पोलिसांना काळ्या रंगाच्या गणवेशात एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. तसेच एक बंदूक आणि इतर सामान मिळाले. याप्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून, अधिक माहिती घेतली जात आहे.

दुसऱ्या घटनेत कांकेर जिल्ह्यात सुरुंग स्फोटात बीएसएफचे उपनिरीक्षक महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. जखमी पोलिसांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com