बी. एस. येडियुरप्पांचा असाही मराठीद्वेष

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

कलबुर्गी - कर्नाटकच्या रणधुमाळीला आता भाषिक वादाची किनार मिळाली आहे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिक्कोडी तालुक्‍यातील बेडकिहाळ येथील सभेत बोलताना मराठी भाषकांची माफी मागितल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. मराठी भाषकांची माफी मागून सिद्धरामय्या यांनी कन्नडिगांचा अवमान केला आहे, त्याचा हा माफीनामा अस्वीकारार्ह असून त्यांनी आता कन्नड जनतेचीच माफी मागावी, त्यांचे हे कृत्य गंभीर गुन्हा असल्याचे येडियुरप्पा  यांनी म्हटले आहे.

सिद्धरामय्यांना डोक्‍याचा भाग नाही, अशी व्यक्ती आणखी काय बोलणार? ते काँग्रेसचे कर्नाटकमधील शेवटचे मुख्यमंत्री ठरणार आहेत. राज्यामध्ये भाजपला सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

भाजपला केवळ पन्नासच जागा
भाजप राज्यामध्ये दीडशे जागा मिळवण्याचे स्वप्न पाहत असून; पण त्यांना केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावे लागणार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणारा आणि तुरुंगास भोगून आलेला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे आपणास वाटते का? असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुधोळ येथील सभेत बोलताना केला. मोदींनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही, कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसतो असा त्यांचा दावा आहे. मोदी हे सर्वांत खोटारडे असून त्यांचा खरा मंत्र हा ‘सबका साथ, सबका सत्यानाश’ असा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकमधील जनता या वेळेस आम्हाला ‘किंगमेकर’च्या नाही तर ‘किंग’च्या भूमिकेमध्ये पुढे आणेल.
- एच. डी. कुमारस्वामी, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष

Web Title: marathi hate by b. s. yeddyurappa