'न्यायालयीन लढ्याचाच बेळगावसाठी पर्याय'

नितीन नायगावकर, हेमंत जुवेकर
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदा -  ‘‘बेळगावच्या संदर्भात कुठलाही राजकीय पक्ष आग्रही नाही. भाजप असो वा काँग्रेस, दोन्ही राष्ट्रीय पक्ष ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच लढा द्यावा लागेल,’’ या शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी समारोपीय भाषणातून पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढविला.

बडोदा येथे आयोजित ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, बडोदा येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘‘माझे बालपण बीदर भालकी या सीमावर्ती भागातील छोट्या गावात गेले. सीमावर्ती भागातील भळभळती जखम माझ्याही काळजावर आहे. बेळगाव, कारवार, निपाणी; तसेच आठशे गावांसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत मीसुद्धा शांत बसणार नाही. सर्वोच्च न्यायालयात बेळगावचा प्रश्न अतिशय ताकदिने मांडला जातोय.’’

संमेलनाध्यक्षांच्या भाषणापूर्वी, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या ठरावांमध्ये बेळगावचा समावेश नसल्याने ‘बेळगावचा विसर पडला का’ असा सवाल श्रोत्यांमध्ये उपस्थित बेळगावकरांनी केला. त्यावर श्रीपाद जोशींनी मध्यस्थी केली. ‘‘यापूर्वीच्या सर्व ठरावांवर पुढील एक महिन्याच्या आत चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखविली आहे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्याच कारणाने बेळगाव आणि मराठी विद्यापीठाचा ठराव यंदा संमेनात आणला नाही. महिनाभरात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही, तर मी तुमच्यासह मंत्रालयापुढे धरणे देईल,’’ असे ते म्हणाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बेळगावचा ठराव जिवंत असल्याचा विश्वासही आपल्या भाषणातून दिला.

रामजन्मभूमी प्रकरणासंदर्भात ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे, त्याचप्रमाणे बेळगावसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना करू.
- लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष

Web Title: marathi news 91 akhil bhartiya marathi sahitya sammelan Laxmikant Deshmukh