दोन सज्ञानांच्या विवाहात हस्तक्षेप नको

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - 'शक्ती वाहिनी' या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात खाप पंचायती संबंधी दाखल केलेल्या याचिकेवर 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.  दरम्यान, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक संबंधात दखल देणाऱ्या खाप पंचायतीला जबरदस्त चपराक लगावली आहे. 'जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसऱ्याने दखल देण्याची अवश्यकता नसल्याचे न्यायलयाने म्हटले आहे. 

यामध्ये अगदी कुटुंबातील लोक असो अथवा समाजातील लोक, दोन सज्ञान व्यक्तिंच्या निर्णयामध्ये कुणालाही अशाप्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा महत्वपूर्ण निर्णय असून, 'व्यक्तीगतरित्या, सामूहिकरित्या किंवा संघटना म्हणून कोणीही कुणाच्या विवाहामध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्यांचे त्यांनी म्हटले. जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यांना जबरदस्ती वेगळे करणे चुकीचे ठरेल,' असे सांगतानाच 'आम्ही इथे काही कथाकथन करत नाही आणि लग्न कशा पद्धतीने होतात हेही सांगायला बसलो नाही' असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

दरम्यान, 'दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण आहात?' असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीच्या वकिलाला केला. 'न्यायालयाला त्यांच्या हिशोबाने काम करू द्या. तुम्ही अशा जोडप्यांबाबत चिंता करू नका,' असे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्राचीन काळातील परंपरांच्या रक्षणाच्या नावावर प्रेमी युगुलांची हत्या करता येणार नाही, असे शक्ती वाहिनीने याचिकेत म्हटले होते. तर, आम्ही अशा प्रकारच्या हत्यांच्या विरोधात आहोत, असे खापच्या वकिलाने न्यायालयात स्पष्ट केले होते. त्यावर न्यायालयाने 'आम्हाला खाप पंचायतीच्या अधिकारांची चिंता नाही. तर लग्न केलेल्या सज्ञान जोडप्यांची चिंता असल्याचे खाप पंचायतीच्या वकिलाला सुनावले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Adults marriage Supreme Court khap panchayats