विमानतळावरील मद्यविक्री कायम, न्यायालयाने बंदीची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

दिल्ली उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली

नवी दिल्ली : देशातील विमानतळांवर सुरू असलेल्या मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

एका 'एनजीओ'ने याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करत विमानतळावरील प्रस्थान क्षेत्रात (डिपरेचर एरिया) मद्यविक्रीला मनाई करण्याची मागणी केली आहे. या बंदीमुळे प्रवाशांना मद्यपान करण्यावर मर्यादा येऊन परिणामी विमानातील कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत होणारे वादही टळतील, असा दावा सदर एनजीओने याचिकेत केला आहे. मात्र, न्यायालयाने ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे स्पष्ट करत ती आज फेटाळून लावली.

सदरची मागणी ही मधुमेह होईल म्हणून साखरेवर बंदी घालावी, अशी आहे. एखादा प्रवाशी बाहेरून मद्यपान करून येईल किंवा येथे येऊन करेल, यावर नियंत्रण ठेवणे ही अवघड बाब असल्याचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्यायाधीश पी. एस. तेजी यांच्या पीठाने स्पष्ट केले.

जर, प्रवाशांना विमानतळावर असलेल्या बारमधून मद्य खरेदी करण्याची मुभा असेल, तर विमान प्रवासादरम्यान मद्याचे सेवन करण्यावर बंदी घालण्यात काहीच अर्थ नाही. नियमानुसार, प्रवासादरम्यान प्रवाशाकडून मद्यपानानंतर होणारे बेशिस्त वर्तन टाळले जावे, हे बंदीमागचे मुख्य कारण असल्याचे एनजीओने म्हटले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: marathi news airport liquor ban petition declined