'सप'च्या सायकलीस हत्तीचे बळ मिळेल?

यूएनआय
शुक्रवार, 16 मार्च 2018

लखनौ : गोरखपूर आणि फूलपूरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर 'यूपी'चे राजकीय चित्र बदलू लागले आहे. अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाच्या मदतीने योगी आदित्यनाथ यांच्या गडाला सुरूंग लावल्याने लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) एकत्र येऊ शकतात अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

लखनौ : गोरखपूर आणि फूलपूरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर 'यूपी'चे राजकीय चित्र बदलू लागले आहे. अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाच्या मदतीने योगी आदित्यनाथ यांच्या गडाला सुरूंग लावल्याने लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) एकत्र येऊ शकतात अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

5 जून 1995 मधील वाद्‌ग्रस्त गेस्ट हाऊस प्रकरणानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रथमच बुधवारी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींची भेट घेतल्याने 'सप-बसप' महाआघाडीची चर्चा पुन्हा रंगली आहे. मायावतींची बेभरवशाची भूमिका लक्षात घेता ही आघाडी आकारास येणे अशक्‍य असल्याचे काही जाणकारांना वाटते. 

शक्‍यता अन्‌ आव्हाने 
'सप-बसप' महाआघाडी झालीच तर तिचे नेतृत्व कोण करणार यावरून उभय पक्षांच्या नेतृत्वात संघर्ष होऊ शकतो. 'दलित की बेटी' पंतप्रधान का होऊ शकत नाही असा दावा करणाऱ्या मायावतींची राष्ट्रीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. 

न्याय्य जागा वाटप हे दोन्ही पक्षांसमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरू शकते, दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाला येथेच मोठा संघर्ष करावा लागेल. 'बसप' उमेदवारांच्या पाठीशी यादव मते उभी करण्याचे अवघड काम अखिलेश यांना करावे लागले तर मायावतींनाही आपले बळ 'सप'च्या पाठीशी उभे करावे लागेल, हे वाटते तितके सोपे नाही. 

मागील निवडणुकीमध्ये कॉंग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असले तरीसुद्धा 2019 मध्ये कॉंग्रेस पक्षही गेमचेंजर ठरू शकतो. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली महाआघाडी तयार झाली तर मात्र 'यूपी'त कॉंग्रेसचे पारडे जड होईल. अशा स्थितीत सप आणि बसप आपल्या हक्काच्या जागा कॉंग्रेसलाही द्यावा लागतील. 

केंद्रात 2019 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही तर केंद्रामध्ये मायावतींची भूमिका महत्वाची ठरू शकते. सध्यातरी मायावती कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांसाठी अनुकूल असल्या तरीसुद्धा ऐनवेळी त्यांची भूमिका बदलू शकते. 

आगामी निवडणुकीत केवळ जातीची गणिते जुळवत 'सप' आणि 'बसप'ला विजयी होता येणार नाही यासाठी प्रस्थापित सरकारप्रती लोकांमध्ये असंतोष निर्माण करावा लागेल. यासाठी दोन्ही पक्षांना एकदिलाने प्रचार मोहीम राबवावी लागेल.

Web Title: marathi news Akhilesh Yadav Mayavati Lok Sabha 2019