टॉयलेट आणि अमित शहांच्या कार्यकर्त्यावरील प्रेमाची अपुरी कथा...

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

आता तरी शौचालय मंजूर होईल....
शौचालय नसल्याने आमची अडचण होते. अमित शहा यांच्या भेटीनंतर तरी काही होईल, अशी आशा कमलसिंह यांच्या पत्नी किरण यांच्यासह इतर कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यामुळे अमित शहा यांनी कार्यकर्त्यावर दाखवलेले हे प्रेम टॉयलेट रुपाने फळाला येते का याबाबत उत्सुकता आहे. 
 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सध्या तळगाळातील लोकांमध्ये भाजपची प्रतिमा निर्माण करून पक्षाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त करत त्यांनी रविवारी मध्यप्रदेश दौऱ्यात आवर्जून एका अत्यंत सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जेवण केले. मात्र, आपल्या घरी शौचालय नसल्याची खंत त्याने नंतर बोलून दाखवली. त्यामुळे ही विसंगती चर्चेचा विषय बनली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात, तसेच परदेशातील भाषणांमध्येही स्वच्छ भारत अभियानाचा आवर्जून प्रसार करत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांनाही शौचालये उभारण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. सेवानिया-गौड भागातील भाजपचे आदिवासी कार्यकर्ते कमलसिंह युईक यांचे घर भोपाळ महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 26 मध्ये आहे. 

अमित शहा पाहुणचार घेऊन गेल्यानंतर बोलताना कमलसिंह यांनी सांगितले की, माझ्याच घरी शौचालय नाही. मी सहा महिन्यांपूर्वी शौचालयासाठी अर्ज केला होता. परंतु, अद्याप मी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. अमित शहा मध्यप्रदेशच्या तीनदिवसीय दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते कमलसिंह यांच्या घरी स्नेहभोजनाला आवर्जून गेले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: marathi news amit shah bjp activist deprived of toilet