सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 मार्च 2018

श्रीनगर - अनंतनाग येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून, यातील दोन दहशतवादी हे स्थानिक आहेत. या दहशतवाद्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा होता. स्थानिक लोकांच्या विरोधाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने श्रीनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले असून, इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यांपैकी इसा फजली श्रीनगर आणि सय्यद ओवेस कोकेरंग येथील होते. त्यांच्याकडून एके-47 रायफल, पिस्तुल, ग्रेनेडसह मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुरक्षा दलांचे काहीही नुकसान झालेले नाही.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी एक हल्ला केला होता. कुलगाममधील नूराबाद परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर सरकारचे माजी मंत्री आणि नूराबाद विधानसभेचे आमदार अब्दूल मजीद यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: marathi news Anantnag Three terrorists killed in encounter