आपण पण गोळीबार करत आहोत - फारुक अब्दुल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - फक्त पाकिस्तानच गोळीबार करत नसून, आपण पण गोळीबार करत आहोत. दोन्ही बाजूने गोळीबार होत असल्याने नागरिकांचा जीव जात आहे, असे वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केले आहे.

फारुक अब्दुल्ला यांनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. आता त्यांनी भारतही गोळीबार करत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने दोन दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघऩ करत गोळीबार व मिसाईल हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले होते. पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. तसेच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे.

फारुक अब्दुल्ला म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजनक वातावरण निर्माण झाले आहे. युद्ध हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही. फक्त चर्चेनेच हे मुद्दे सोडविले जाऊ शकतात.

Web Title: marathi news arooq abdullah controversial remarks on ceasefire violation by pakistan