सचिवांना मारहाण करणाऱ्या 'आप'च्या आमदारांना न्यायालयीन कोठडी 

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण करणारे सत्ताधारी 'आप'च्या दोन आमदारांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. यामध्ये आमदार अमानतुल्ला खान आणि प्रकाश जरवाल यांचा समावेश आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीमध्येच खान आणि जरवाल यांनी प्रकाश यांना मारहाण केली होती. यानंतर दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. या प्रकरणी 'आप'च्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती. 

पोलिसांनी खान आणि जरवाल यांना अटक करून त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. या दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळली. 

सोमवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अंशू प्रकाश सोफ्यावर बसले असताना खान आणि जरवाल यांनी त्यांना मारहाण केली. या संदर्भात अंशू प्रकाश यांनी काल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 'आप'ने हे आरोप फेटाळले आहेत. 'अंशू प्रकाश भाजपचे एजंट असल्यासारखे वागत आहेत' असा आरोप 'आप'ने केला. 

'आज आमच्याविरोधात भाजप आणि कॉंग्रेसने एकत्र आघाडी उघडली आहे. अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. उलट आमच्या मंत्र्यांनाच मारहाण झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करण्यात आले. याविरोधात पोलिसांनी कारवाई केलेली नाही', असा दावा अमानतुल्ला खान यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com