बेळगावातील जाळपोळ प्रकरणी 23 अटकेत

crime
crime

बेळगाव : सोमवारी रात्री खडक गल्ली, दरबार गल्ली खडे बाजार मधील शितल हॉटेल परिसरात धुडगूस घालणाऱ्या 23 संशयितांना पोलिसांनी अटक केली. जाळपोळ व दगडफेकीच्या वेळी दोन पोलीस अधिकारी जखमी झाले असून काही वाहनेही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. आज सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.

सोमवारी रात्री संवेदनशील असलेल्या खडक गल्ली परिसरात अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. दगड , बाटल्या विटांचे तुकडे भिरकावले जाऊ लागले. सुमारे 25 मिनिटे समाजकंटकांचा नंगानाच सुरू होता. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, पोलीस निरीक्षक प्रशांत एस. यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या परंतु बेफाम बनलेल्या समाजकंटकांनी पोलिसांवर प्रतिहल्ला केला. यामध्ये एसीपी मारिहाळ  यांच्या कपाळावर दगड बसून रक्तस्त्राव सुरू झाला, शिवाय निरीक्षकांच्या डोकीत तीन आणि पायावर एक असे चार दगड बसले. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.

आक्रमक बनलेल्या समाजकंटकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या, दोन मोटारींना लावली तर काही वाहनांचेही नुकसान केले शिवाय शीतल हाँटेलजवळील मंदिरावर दगडफेक केली आयजीपी व प्रभारी पोलीस आयुक्त डाँ. रामचंद्र राव, डीसीपी सीमा लाटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री तसेच  आजही घटनास्थळी भेट दिली. या परिसरात अद्याप ही तणावपूर्ण स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com