बेळगावच्या महापौरपदी काँग्रेसचे बसप्पा चिखलदिनी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

बेळगाव : महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे बसप्पा चिखलदिनी यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मधूश्री पुजारी यांनी विरोधी उमेदवार शांत उपपर यांचा पराभव करत विजय प्राप्त केला.

महापौर पद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित होते. या प्रवर्गाचा उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीकडे नसल्याने कन्नड भाषिक चिखलदिनी यांची निवड बिनविरोध झाली. तर उपमहापौरपदी मधूश्री पुजारी यांनी शांत उपपर यांचा पराभव केला. त्यामुळे कन्नड भाषिक महापौर तर मराठी भाषिक उपमहापौर अशी स्थिती बेळगावात झाली आहे. 

Web Title: Marathi news belgum news mayor congress basapaa chikhaldini