भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेस उत्साहात प्रारंभ

स्मती सागरिका कानुनगो
सोमवार, 26 जून 2017

पुरी (ओडिशा) - येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता देश-परदेशातील लाखो भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रेमुळे पुरीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा नऊ दिवसांचा प्रवास आजपासून सुरू झाला. या मूर्ती नऊ दिवसांनंतर मंदिरामध्ये पोचतील.

या तिन्ही मूर्ती मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर अनेक विधी पार पडल्या. यामध्ये "मंगल आरती' आणि "मैलम' यांचा समावेश होता. या तिन्ही देवतांना रत्न सिंहासनावरून उतरविल्यानंतर त्यांचे हिरे रत्नजडीत मुकुटही बाहेर आणण्यात आले. भगवान जगन्नाथांसाठी 45 फूट उंचीचा "नंदीघोष' नामक सोळा चाकांचा रथ तयार करण्यात आला असून, भगवान बलभद्र यांच्यासाठी 44 फूट उंचीचा 14 चाकांचा रथ तयार करण्यात आला आहे. देवी सुभद्रा या 43 फूट उंचीच्या "दारपादलन' या रथामध्ये विराजमान झाल्या असून, त्यांच्या रथास बारा चाके आहेत. गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी आपल्या शिष्यांसह आज भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. पुरीचे राजे दिव्यसिंह देव यांच्या हस्तेही जन्नाथाची पूजा करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर यात्रेनिमित्त पुरीमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: marathi news bhagwan jagannath sakal news yatra news