भीष्माचार्यांच्या मदतीस "शॉटगन'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय खलबतांना वेग आला असताना भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी हेच या पदासाठी सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. अडवानी हे शारिरीकदृष्ट्या सक्षम असून घटनात्मक जटीलता समजून घेण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे. ते कोणाच्याही प्रभावाखाली न येता राष्ट्रहितार्थ निर्णय घेऊ शकतात असे सिन्हा यांनी ट्‌विटरवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारावर मतैक्‍य व्हावे म्हणून भाजप नेत्यांची तीन सदस्यीय समिती कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व अन्य विरोधी नेत्यांची भेट घेणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिन्हा यांनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. अडवानींच्या उमेदवारीस कोणीही विरोध करणार नाही. पक्षात आणि पक्षाबाहेरून देखील त्यांना विरोध होणार नाही. तरूण नेत्यांपेक्षाही अडवानी हे अधिक उत्साही असून त्यांनी स्वत:ला चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे ते देशाची जबाबदारी देखील पेलू शकतात असे सिन्हा यांनी म्हटले आहे .

सिन्हा अडगळीत
भाजपमध्ये मोदी शहा युग अवतरल्यापासून शत्रुघ्न सिन्हा हे अडगळीत पडले आहेत. कधीकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात वावरणाऱ्या सिन्हा यांना मंत्रिपदापासूनही दूर ठेवण्यात आले होते. मध्यंतरी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी उघडपणे संयुक्त जनता दलाचे समर्थन करत मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार हेच सर्वांत लायक उमेदवार असल्याचे म्हटले होते. बिहार भाजपमधील नेत्यांशीही सिन्हा यांचे विशेष पटत नसल्याने ते राजकारणापासून दूरच आहेत.

Web Title: marathi news bhismacharya shotgun lalkrushna adwani