भाजपाला धक्का, चंद्राबाबूंनी एनडीएची साथ सोडली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन शुक्रवारी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार असतानाच, चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्षाने अखेर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी तेलुगू देसमने केली, मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. 

भाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Bjp andhra pradeshs telugu desam party narendra modi