तामिळनाडूतील भाजप कार्यालयावर बॉम्ब हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

कोइंबतूर - तामिळनाडूतील भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या घटनेचा पेरियार यांची मूर्ती तोडण्याशी संबंध असावा अशी शक्यता वर्तविली जात असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. 

पोसिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कोइंबतूर येथे मंगळवारी संध्याकाळी उशिरा भाजप कार्यालयावर हा पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

दरम्यान, पेरियार यांचे पुतळे तोडण्याची धमकी भाजप नेते एच. राजा यांनी दिली होती. त्यानंतर पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस झाली असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक भाजपचा, तर दुसरा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. 

Web Title: marathi news BJP office petrol bomb Periyar statue vandalised