शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

जोधपूर - चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे जोधपूरमध्ये शूटिंग सुरू होते. त्याचवेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून एक डॉक्टरांची टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबईत आणणार असल्याचे समजले होते. परंतु, तपासणीनंतर अमिताभ जोधपूरमध्येच राहणार आहेत.

आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे शूटिंग जोधपूरमधील मेहरानगढ किल्ल्यावर सुरू होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. आमिर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती. दरम्यान बिग बींनी सोमवारी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी उल्लेख केला होता. 'काही लोक जगण्यासाठी काम करतात, खूप मेहनत घेतात. उद्या सकाळी डॉक्टरांची टीम माझी तपासणी करेल आणि त्यांच्यामुळे मी पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होईन. सध्या मी आराम करत आहे पण याविषयी वेळोवेळी माहिती देणार आहे,’ असे त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा कंफेशन ऑफ ए ठग' या कादंबरीवर बेतलेला चित्रपट आहे.  

Web Title: marathi news bollywood amitabh bachchan thugs of hindostan movie