लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जितेंद्र यांच्याविरोधात गुन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

शिमला - लैंगिक शोषण प्रकरणी बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांच्याविरोधात शिमला पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण 47 वर्षे जुने असून, त्यांच्या एका नातेवाईक महिलेने हा आरोप केला आहे. शिमला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांच्याविरोधात त्यांच्या नातेवाईक महिलेने फेब्रुवारीत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिमल्यात जानेवारी 1971मध्ये ही घटना घडली होती. पीडित महिला त्यावेळी 18 वर्षांची आणि जितेंद्र हे 28 वर्षांचे होते. एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जितेंद्र यांनी तिला शिमल्यात बोलावून घेतले होते. तेथे पोहोचल्यानंतर एका रात्री जितेंद्र मद्यधुंद अवस्थेत तिच्या खोलीत गेले आणि लैंगिक शोषण केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जितेंद्र यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

लीस अधीक्षक ओमपती जामवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: marathi news bollywood jeetendra actor Sexual assault complaint