हे विनाशकारी बजेट सर्वसामान्यांच्या थोबाडीत - अखिलेश यादव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

अरुण जेटली यांनी ट्विटर वरुन अर्थसंकल्प मांडतानाचे लाईव्ह केले. तर अमित शाह, शिवराज सिंग चौहान, अखिलेश यादव, पियुष गोयल, स्मृती इराणी यांनी बजेट 2018 वर दिलेल्या प्रतिक्रीया...

नवी दिल्ली - बजेट 2018 तर सादर झाले. पण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निराशेला या बजेटने वाव ठेवलाच. तर काही बाबतीत म्हणजेच शेती, उद्योग, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे, त्यामुळे दिलासाही बजेटने दिला आहे असे म्हणता येईल. यावरुन राष्ट्रीय स्तरावर अनेक टिका टिपणी सध्या केली जात आहे. अरुण जेटली यांनी ट्विटर वरुन अर्थसंकल्प मांडतानाचे लाईव्ह केले. तर अमित शाह, शिवराज सिंग चौहान, अखिलेश यादव, पियुष गोयल, स्मृती इराणी यांनी दिलेल्या प्रतिक्रीया...

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले, 'समाजातील प्रत्येक स्तराचा समतोल साधणारा अर्थसंकल्प आहे. गरीबांसाठी शेती आणि आरोग्याच्या सुविधा यांवर दिलेला भर महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्था देखील आजच्या अर्थव्यवस्थेनंतर वृध्दीस लागेल. माझ्याकडून पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री जेटली यांना शुभेच्छा.' 

तर महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, 'जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करते. गरीबांचा विकास, शेतकरी व त्यांचे उत्पन्न वाढीस, जेष्ठ नागरीक आणि महिला या सर्वांसाठीच या बजेट मध्ये कल्याणकारी योजना आहेत.'  

संबंधित बातम्या -

 

 

 

 

Web Title: marathi news budget 2018 comments political leaders