अर्थसंकल्प प्रथमच हिंदीतून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला आज (गुरूवार) केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 'देसी' टच दिला. अर्थमंत्र्यांनी आतापर्यंतची परंपरा मोडून हिंदीतून अर्थसंकल्पाचे भाषण केले. स्वातंत्र्योत्तर भारताच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हिंदीतून अर्थसंकल्प सादर केला आहे. 

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता कदाचित जेटली यांना पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची ही शेवटची संधी आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवित त्यांनी अर्थसंकल्प हिंदीतून सादर केला. सरकारने केलेली कामगिरी, प्रस्तावित केलेल्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत अधिक थेटपणे पोहोचण्यात हिंदीतून सादर केलेल्या अर्थसंकल्पाची मदत होऊ शकते. 

Web Title: marathi news budget 2018 in hindi first time arun jaitley