सुरवात अर्थसंकल्पाची...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

 केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाली आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प 2018 सादर करणार आहेत. 2019 पूर्वी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या प्रती घेऊन अरुण जेटली संसदेत दाखल झाले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच केंद्रिय अर्थसंकल्प हिंदीतून सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प हिंदी भाषेतून सादर करणारे अरूण जेटली हे भारताचे पहिले अर्थमंत्री ठरणार आहेत.

Image may contain: 5 people, people smiling, people standing, suit and indoor

कृषी आणि आरोग्य क्षेत्र बजेटच्या केंद्रस्थानी असतील. सोबतच वोट बँक असलेले मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठीही विशेष तरतूदींचा समावेश बजेटमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना दिसाला मिळेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ५४ हजार कोटी रुपये किमतीचा प्रकल्प असलेला एमयूटीपी-३ ए, शिवाय लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य सोयीसुविधांसाठीचा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची शक्यता आहे. 'सर्व सामान्यांची स्वप्न पुर्ण करणारा अर्थसंकल्प' असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: marathi news budget 2018 new delhi arun jaitley