स्कूल बसवर हल्ल्यानंतर दिल्लीतील शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

गुडगाव - 'पद्मावत' चित्रपटाच्या निषेधार्थ काल जमावाने गुडगावमध्ये एका शाळेच्या बसवर हल्ला केल्यानंतर काही दिवस दिल्लीतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गुडगावमधील चार मुख्य शाळांनी आठवडाभर शाळांना सुट्टी राहील असे घोषित केले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असा काहीही प्रसंग आम्ही टाळू, असेही या शाळांचे म्हणणे आहे.  

काल (ता. 24 जानेवारी) एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका शाळेच्या बसवर दगडफेक जमावाने केली होती. जीडी गोयंका वर्ल्ड स्कूलची ही बस होती. ज्यात विद्यार्थ्यांमिळून 24-25 जण होते. ही बस रस्त्यावरुन जात असताना बस अडवण्याचा प्रयत्न जमावाने केला. दगडफेक करुन बसच्या काचा फोडल्या. हा जमाव 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रर्दशनाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. कोणत्याही प्रकारचे सामाजिक भान न ठेवता या जमावाचा असा  विरोध सुरु होता. प्रसिध्द झालेल्या व्हिडिओत बसमधील लहान मुले घाबरलेली व रडताना दिसत आहेत. दगड लागण्यापासून वाचण्यासाठी ही मुले बसच्या फ्लोअरवर सिटच्या आड लपून बसली होती.

Related image

60 गुडांनी मिळून बसवर दगड आणि बांबूने हल्ला केला. नर्सरी ते वर्ग बारावीतील मुले या बसच्या आत होती. शाळेतून घरी जात असताना दुपारी 3 वाजता दरम्यान ही घटना घडली. ज्या जागी हा हल्ला झाला, त्या जागी याच जमावाने थोड्या वेळापूर्वी जाळपोळ देखील केला होता. बस चालकाने या हल्ल्यातून सुरक्षितपणे जमावाच्या तावडीतून बसचा मार्ग काढला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी बस हलविल्यानंतर पोलिसांना कळविले. 
Image result for karni sena esakal

हा हल्ला आपल्या समाजासाठी 'लज्जास्पद' असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पद्मावत विरोधात होणाऱ्या हिंसाचारावर टिका करत ही हिंसा देशाची राख करेल असे म्हणत भाजप वर टिका केली.

Web Title: marathi news bus was attacked in Gurgaon by a mob protesting against Padmaavat