चंडीगडमध्ये व्यवसायांना ऑनलाइन परवाने

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

चंडीगड - व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकत चंडीगडने सर्व परवाने देण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेची सुरवात केली आहे. आता व्यवसायाचे सर्व परवाने ऑनलाइन मिळणार आहेत.

चंडीगड - व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकत चंडीगडने सर्व परवाने देण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेची सुरवात केली आहे. आता व्यवसायाचे सर्व परवाने ऑनलाइन मिळणार आहेत.

या सेवेचे उद्‌घाटन पंजाबचे राज्यपाल व चंडीगडचे प्रशासक व्ही. पी. सिंह बडनोर यांनी आज केले. राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) ही ऑनलाइन यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन परवानगी आणि ती ठराविक कालमर्यादेत मिळेल. तसेच, सर्व विभागांकडून व्यवसायाचा नूतनीकरण परवानाही ऑनलाइन मिळणार आहे. मालमत्ता, कामगार, अभियांत्रिकी विभागासह चंडीगड महापालिकेची परवानेही ऑनलाइन मिळतील. या वेळी बोलताना बडनोर म्हणाले, ""नव्या यंत्रणेमुळे व्यवसाय करण्यासाठी परवाने मिळण्यातील अनावश्‍यक विलंब दूर होतील. याचबरोबर सध्याच्या व्यवसायातील सरकारी परवान्यांच्या अडचणी दूर होतील.''

Web Title: marathi news chandigarh news india news online permission