70 लाख नवे रोजगार निर्माण होणार!

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात 70 लाख नव्या रोजगारनिर्मितीची घोषणा केली आहे. भारतात तरूणांची संख्या मोठी असल्याने रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. वस्त्रोद्योग, चर्मउद्योग या क्षेत्रांमध्ये 50 लाख तरूणांना 2020 सालापर्यंत प्रशिक्षण देण्याची योजना आहे. 

येत्या 3 वर्षात नवीन कर्मचाऱ्यांचा ईपीएफ 12 टक्के करण्यात येईल. महिलांसाठी ईपीएफ 12 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आला आहे. या शिवाय महिलांची मॅटर्निटी लीव 3 महिन्यावरून 6 महिने करण्यात आली आहे. 
 
अरूण जेटलींनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप इंडिया या योजनेची सुरूवात करण्यात आली होती, ज्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. या अर्थसंकल्पात लघुउद्योगांसाठी 3794 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 3 लाख कोटींची तरतूद केली आहे. 

Web Title: Marathi news country news budget 2018 arun jaitley employment creation