कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने गर्भवतीच्या पोटात लाथ मारली! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

तिरुअनंतपुरम : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक नेत्याने एका गर्भवतीच्या पोटात लाथ मारल्याने तिला जन्म देण्यापूर्वीच बाळाला गमवावे लागले. केरळमधील कोडेन्चेरीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. 

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता तंबी याने साडेचार महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटात लाथ मारली. यामुळे त्या महिलेस गर्भपात करणे भाग पडले. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही, असा आरोप त्या महिलेच्या कुटुंबीयांनी केला. हे प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यात त्या महिलेच्या शेजाऱ्यांचाही समावेश आहे. 

त्या महिलेच्या घराभोवतीच्या भिंतीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान सात-आठ जणांनी या कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यात तंबीने त्या गर्भवतीला मारहाणही केली. त्यावेळी पोलिसांना दूरध्वनी केला असता 'घटनास्थळी येण्यासाठी वाहन उपलब्ध नाही' असे उत्तर त्यांना मिळाले. त्या गर्भवतीने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हल्लेखोरांपैकी एका महिलेने तिचे हात बांधले आणि तिला मारहाण करण्यास इतरांना चिथावणी दिली. 

पीडित महिलेच्या आरोपानुसार, तंबीने तिच्या पोटावर लाथ मारली. या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण रक्तस्रावामुळे पोटातील गर्भ वाचविण्यात डॉक्‍टरांना यश आले नाही. 

भिंतीवरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी त्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडेही यापूर्वी धाव घेतली होती. त्यावर कारवाई करत प्रशासनाने जागेची पुन्हा मोजणी करून हद्द आखून दिली होती. त्यानंतरही आरोपींनी या जागेवर अतिक्रमण करत पीडित कुटुंबीयांना धमकाविले होते. 

Web Title: marathi news CPIM leader kicks Pregnant woman in Kerala