हुंड्यासाठी 'ती' झाली पुरुष, लग्न करून दोघींची फसवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

उत्तराखंड -  उत्तराखंडमधील एका महिलेने आपण पुरुष असल्याचे भासवून हुंड्यासाठी दोन महिलांशी विवाह केल्याचे उधड झाले आहे. तसेच हुंड्यासाठी तिने या दोन्ही महिलांची छळवणूकही केल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले असून, स्वीटी सेन (25) असे या महिलेचे नाव आहे. कृष्णा सेन असे नाव धारण करत तिने दोन्ही महिलांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

2013मध्ये स्वीटीने फेसबुकवर कृष्णा सेन या नावाने अकाऊंट उघडले. स्वीटी पुरुषांसारखी दिसत असल्याने तीने या गाष्टीचा फायदा घेत, आपण पुरुष असल्याचे भासवून सुरुवातीला काही तरुणींशी चॅटिंगही केले. फेसबुकच्या माध्यमातून स्वीटीने 2014मध्ये काठगोदाम येथील एका तरुणीशी ओळख वाढवली. आपण अलिगढमधल्या एका व्यावसासिकाचे सुपुत्र असल्याचे तिने या तरुणीला सांगितले. स्वीटीच्या थापांना बळी पडलेल्या या तरुणीने तिच्याशी वर्षभरात लग्नही केले. लग्नानंतर वर्षभराने स्वीटीने हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करायला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीटीने पहिल्या पत्नीकडून साडेआठ लाख रुपये उकळले.

त्यानंतर 2016मध्ये तिने दुसरे लग्न केले. या तरुणीकडूनही स्वीटीने हुंड्यांची मागणी केली होती. स्वीटीच्या दुसऱ्या पत्नीने पोलीसांत तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही पत्नींना कित्येक महिने स्वीटी ही महिला असल्याचे माहिती नव्हते. स्वीटीचे सत्य उघड झाल्यानंतर तिने पैशांचे आमिश दाखवून दोन्ही पत्नीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आपले गुपित उघड होईल या भीतीने स्वीटी पळून गेली होती. अखेर पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशमधून अटक केली.

Web Title: marathi news crime marriage woman poses as man