शाळेच्या तिसऱया मजल्यावरून विद्यार्थीनीला फेकून दिले?

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिला तिसऱया मजल्यावरून फेकून दिले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिला तिसऱया मजल्यावरून फेकून दिले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

मॉडर्न माँटेसरी इंटर कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. नीतू चौहान असे विद्यार्थीनीचे नाव आहे. ती अकरावीला होती. उपलब्ध माहितीनुसार, कॉलेजमधील टॉयलेटमध्ये जाण्यासाठी म्हणून ती वर्गातून बाहेर पडली आणि काही मिनिटांनी तिचा मृतदेह कॉलेजच्या चौकात पडलेला दिसला. कॉलेजच्या अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, नीतूला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. 

नीतूचे वडील परमहंस चौहान यांनी अनोखळी व्यक्तींविरुद्ध पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. 'नीतूला रुग्णालयात नेत असताना माझ्या मुलाने तिला काय झाले आहे, असे विचारले होते. त्यावर नीतूने मला कुणीतरी ढकलले, असे सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,' असे परमहंस यांनी सांगितले. 

कुटुंबियांच्या दाव्यानुसार, कॉलेज व्यवस्थापनाने नीतूच्या घटनेबद्दल घरी कळवले नाही. तिच्या मैत्रिणींनी फोन केल्याचे वडिलांनी सांगितले. 

कॉलेजची सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालेले नाही. मॉडर्न माँटेसरी इंटर कॉलेज देवरियामधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. 1988 मध्ये या कॉलेजची स्थापना झाली. गुरगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षे वयाच्या प्रद्युम्न ठाकूर याचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathi news crime news in Marathi school girl thrown