घोटाळे केले आणि पळून गेले...

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिक नीरव मोदीने याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच देशातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. नीरव मोदीपूर्वी देखील काही व्यावसायिक बँकांना गंडा घालून पलायन केले असून, ही यादी वाढतच आहे. यातील प्रमुख नावे व त्यांचे कारनामे.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिक नीरव मोदीने याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच देशातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. नीरव मोदीपूर्वी देखील काही व्यावसायिक बँकांना गंडा घालून पलायन केले असून, ही यादी वाढतच आहे. यातील प्रमुख नावे व त्यांचे कारनामे.

पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार असलेला नीरव मोदी जानेवारी महिन्यातच कुटुंबीयांसह देश सोडून फरार झाल्याचे उघड झाले आहे. तो फायरस्टोन डायमंड कंपनीचा मालक  असून, सध्या तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Image may contain: 1 person, smiling, standing, suit, sky and outdoor

मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याने विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पलायन केले आहे. मल्ल्याला परदेशी जाण्यापासून रोखावे अशी संबंधित बँकांनी मार्च 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. मात्र तो निसटण्यात यशस्वी ठरला. सध्या तो लंडनमध्ये असून, त्याच्यावर तेथे खटला चालू आहे.

Image may contain: 2 people, people smiling, sunglasses

आयपीएलमधील नियमांच्या गोपनीयतेचा भंग व आर्थिक अपहार केल्याप्रकरणी 2010मध्ये ललित मोदी चर्चेत आला. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत त्याने इंग्लंडला पलायन केले. 2011मध्ये त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. आयपीएलचा सर्वेसर्वा असताना परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याची नोटीस सक्तवसुली संचालनालयाने मोदीवर बजावली आहे. मात्र या नोटीसला त्याने लंडनच्या न्यायालयात आव्हान दिले आहे.

Image may contain: 1 person, sunglasses

उद्योग सल्लागार दीपक तलवारविरोधात प्राप्तिकर कार्यालयाने पाच गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. स्वत:च्या तसेच कुटुंबीयांच्या बँक खात्यांत शेकडो कोटी रुपयांची रक्कम अवैधपणे जमा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तलवार हा सध्या संयुक्त अरब आमिरातीमध्ये आहे.
 

Deepak Talwar

Web Title: marathi news crime scam nirav modi vijay mallya lalit modi deepak talwar