'ती'ला शोधण्यासाठी त्याने केला 600 किमी सायकलप्रवास

cycle
cycle

जमशेदपूर - 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त अनेकजण आपल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असतात. आपल्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी एखादे गिफ्ट घेतात. आणि खऱ्या प्रेमाच्या आणाभाकाही घेतात. परंतु, जमशेदपूरमध्ये खरे प्रेम म्हणजे काय सांगणारी एक घटना घडली. आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी एका व्यक्तीने सायकलवरुन 24 दिवसांत चक्क 600 किमी प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. मनोहर नाईक(45) यांनी आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी केलेली ही धडपड अखेर यशस्वी ठरली आणि पश्चिम बंगालमधील खारंगपूर येथे त्यांची पत्नी सापडली.  

14 जानेवारी रोजी नाईक त्यांच्या पत्नी अचानक गायब झाल्या. मकर संक्रांती साजरी करण्यासाठी त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या. परंतु, दोन दिवस झाले तरी त्या घरी न परतल्याने नाईक यांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांना कोणतिही माहिती मिळत नसल्याचे कळाल्यावर त्यांनी आपल्या पत्नीच्या शोधार्थ संपूर्ण राज्यभर प्रवास करण्याचे ठरविले. आपल्या पत्नीच्या शोधात मनोहर नाईक यांनी बलीगोडा गावातून प्रवास सुरु केला. ते रोज 25 किमी प्रवास करत होते. 24 दिवसांत ते 65 गावांमधून फिरले. 

मनोहर यांची पत्नी अनिताची मानसिक स्थिती योग्य नसून, त्यांना व्यवस्थित बोलताही येत नाही. 

'मी माझी खराब झालेली सायकल दुरुस्त करुन घेतली आणि एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास सुरु केला. किती अंतर मला कापायचे आहे याची काहाही कल्पना नव्हती', असेही मनोहर यांनी सांगितले. 

जेव्हा शोध घेऊनही पत्नी सापडत नव्हती तेव्हा मात्र मनोहर यांनी वृत्तपत्रात बेपत्ता झाल्याची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि काही लोकांनी आपण या महिलेला खारंगपूर येथे रस्त्याशेजारी बसलेले बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी लगेचच मनोहर यांच्या पत्नीला आपल्या ताब्यात घेतले. मनोहर यांनाही पोलिसांनी कळवले आणि अखेर 10 फेब्रुवारीला त्यांची ताटातूट संपली आणि भेट झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com