दिपिकाला नितू-ऋषी कपूरकडून खास गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

'पद्मावत' चित्रपटाची चर्चा या ना त्या कारणावरुन सध्या रोजच सुरु आहे. कधी कुणाची वक्तव्ये तर कधी कुणाचा विरोध.. दिपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर यांची भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवाई मिळवतोय. पण दुसरीकडे मात्र करणी सेना आपला आडमुठेपणा काही सोडायला तयार नाही. हा चित्रपट बघितल्यानंतर बॉलीवुडमधून चित्रपटातील कलाकारांवर भरभरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. असेच एक कौतुक नुकताच दिपिका पदुकोणचे इंडस्ट्रीतील एका सदाबाहार जोडप्याने केले आहे. ते जोडपं म्हणजे नितू आणि ऋषी कपूर.

दिपिकाचा पूर्वश्रमीचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूर याच्या आई-वडिलांनी हे खास गिफ्ट दिल्याने या गिफ्टची जास्त चर्चा आहे. दिपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊट वरुन या गिफ्टसोबत आलेल्या शुभेच्छा पत्राचा फोटो पोस्ट केला आहे. या पत्रात लिहिले आहे की, 'आम्हाला तुझा अभिमान आहे. नितू आणि ऋषी कपूरकडून तुला खूप सारे प्रेम.' यावर दिपिकाने फोटो खाली लिहिले, 'तुम्हाला प्रिमिअरला पाहून खूप बरं वाटलं. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठींब्यासाठी खूप खूप धन्यवाद.' 

Image may contain: text

संबंधित बातम्या - 

Web Title: marathi news deepika padukon padmavat neetu rishi kapoor gift