@officeofRG चे झाले @RahulGandhi

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाअधिवेशनापूर्वी आपले @officeofRG या नावाने असलेल्या ट्विटर हँडलचे नाव बदलून @RahulGandhi असे करत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाअधिवेशनापूर्वी आपले @officeofRG या नावाने असलेल्या ट्विटर हँडलचे नाव बदलून @RahulGandhi असे करत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वी ट्विटर हँडलला आपले नाव न देता officeofRG असे ठेवले होते. ते या अकाऊंटवरून ट्विट करत होते. मात्र, आता त्यांनी आपले नाव देत महाअधिवेशनाला येणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांचे स्वागत नाव बदललेल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. ट्विटर हँडलचे नाव बदलल्यानंतर त्यांनी प्रोफाईल फोटोही बदलला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलल्याचे काँग्रेसच्या अकाऊंटवरूनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून राफेल करारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राफेल विमान खरेदी व्यवहारात देशाचे 36 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एकीकडे लष्करी दले पैशांची मागणी करीत असताना दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे नुकसान झाले आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन विमानांच्या किमतींबाबत असत्य बोलत असल्याचे लढावू विमाने बनविणारी फ्रेंच कंपनी "डॅसॉल्ट ऍव्हिएशन'ने म्हटले आहे.

Web Title: Marathi news delhi news rahul gandhi @officeofRG to @RahulGandhi twitter handle name changes