खा.सुप्रिया सुळेंचा लोकसभेत हमीभावाबाबत सरकारला प्रश्न 

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या सत्रात शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. 

नवी दिल्ली : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या सत्रात शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. 

पिकांच्या लागवडीचा खर्च राज्यनिहाय वेगळा आहे. महाराष्ट्रातील पिकांच्या लागवडीचा खर्च हा जास्त आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना देण्यात येईल परंतु यासाठी विशिष्ट फॉर्म्युला सरकारने केला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. 

तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार c2 फॉर्म्युला किमान आधारभूत किंमतीसाठी सरकारने ठरवला आहे का तसेच किमान आधारभूत किंमत सरकार देणार असेल तरी ती कधी देणार आणि कोणत्या पिकासाठी देणार हे सरकारने स्पष्ट करावे अशी पृच्छा त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना केली.

Web Title: Marathi news delhi news supriya sule farmer