दिवाळीत 'हे' शहर ठरले देशातील सर्वात दूषित

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

या दिवाळीत दिल्लीत होणाऱ्या प्रदुषणातील वाढ पाहता सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी आपली आस्था दाखवली. हे प्रमाण कमी व्हावे म्हणून दिल्लीत फटाके विक्रीवर प्रतिबंध आणला.

अलवार : राजस्थानातील भिवडी हे शहर तेथील हवेचे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमुऴे आधीच कुप्रसिद्ध आहे. परंतु आता प्रदूषण पातळीत सातत्याने होणाऱ्या अनिश्चित फरकामुळे हे शहर देशातील सर्वांत दूषित शहर बनले आहे.
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीत सादर केलेल्या एका अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, या शहराच्या आजूबाजूच्या शहरांतील वायूप्रदूषण देखील वाढले आहे. दिल्लीच्या हद्दीत असणाऱ्या अलवारमध्ये भिवडी हे शहर सर्वात दूषित आहे, तर दुसऱ्या स्थानावर कोलकता आणि तिसऱ्या स्थानावर आग्रा असून, ही तिन्ही देशातील सर्वात दूषित शहरे आहेत.

आग्रा शहर 2016 मध्ये सर्वात दूषित शहर होते. भिवडी येथील उद्योगांतून निघणाऱ्या अपायकारक वायूंमुळे वायूप्रदुषणाचे प्रमाण वाढले होते. दिवाळीत ही अवस्था अजून बिकट बनली. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने 19 ऑक्टोबर रोजी हवेची गुणवत्ता सूची (AQI) अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये हे स्पष्ट झाले की, भिवडीच्या प्रदुषणाची पातळी ही 425 मायक्रोग्रॅम प्रती गण मीटर इतकी होती. तर कोलकाताची 358 मायक्रोग्रॅम प्रती गण मीटर आणि आग्राची 332 मायक्रोग्रॅम प्रती गण मीटर इतकी वायूप्रदुषणाची पातळी होती.

या दिवाळीत दिल्लीत होणाऱ्या प्रदुषणातील वाढ पाहता सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी आपली आस्था दाखवली. हे प्रमाण कमी व्हावे म्हणून दिल्लीत फटाके विक्रीवर प्रतिबंध आणला. 
भिवडी हे शहर सर्वात जास्त प्रदुषित शहर असल्याचे लक्षात घेऊन येथील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने येथील अनेक उद्योग बंद करण्याचे आदेश दिले होते. या उद्योगांमुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत होते. परंतु असे करूनही येथील प्रदुषणाचे प्रमाण अद्याप वाढतच आहे. 
 
आता येथील प्रदूषणाचा परिणाम लोंकाच्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. या दिवाळीत श्वसन व फुप्फुसासंबंधीचे आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवले आहे. याबाबत डॉक्टर म्हणाले की, दिवाळीत भिवडी येथे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणामुळे येथील लोक श्वसनविषयक उपचारांसाठी येतात. अशावेळी लोकांनी मास्क लावून सावधगिरी बाळगली पाहिजे. हिवाळ्यातील धुक्यामुळे ही प्रदूषित हवा ओसरत नाही त्यामुळे अशा रुग्णांसाठी हे प्रदूषण असह्य ठरू शकते.

re>

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


 
Web Title: marathi news diwali most polluted city bhiwadi alwar