आमिरने इंस्टाग्रामची पहिली पोस्ट 'यांना' केली समर्पित

बुधवार, 14 मार्च 2018

'आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे.' असे फोटो कॅप्शन देत आमिरने 'तिचा' जुना फोटो शेअर केला आहे.

आपल्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आमिर खान याने त्याच्या चाहत्यांना छान सरप्राइज दिले आहे. इंन्स्टाग्रामवर आमिरने आपले अकाऊंट सुरु केले आहे. तसेच आपल्या अकाऊंटवरुन त्याने इंस्टाग्रामवरील पहिला फोटो आणि स्टेटस स्टोरी सुध्दा शेअर केली आहे. फेसबुक, ट्विटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मस् वर आमिरचे अकाऊंट आहे. पण इंस्टावर त्याने आज अकाऊंट उघडले आहे. 

Aamir khan birthday

इंस्टाग्रामची सुरवात आमिरने आपली आई जीनत हुसैन यांचा फोटो शेअर करत केली. 'आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे.' असे फोटो कॅप्शन देत आमिरने आईचा जुना फोटो शेअर केला आहे. तर इंस्टावरील स्टेटस स्टोरीच्या माध्यमातून त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे. आपले इंन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केल्यानंतर काही तासांतच आमिरच्या फॉलोवर्सची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर आज 6 वाजता आमिर त्याच्या चाहत्यांशी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हितगुज साधणार आहे.  

Aamir khan birthday

आमिरने बांद्रातील 'फ्रिडा' या आपल्या राहत्या घरी वाढदिवसाचा केक कट केला. यावेळी पत्नी किरण राव हिच्याबद्दलचे प्रेम त्याने तिचे चुंबन घेत व्यक्तं केले. गेल्यावर्षी आमिरचा 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट आला होता. सध्या आमिर 'ठग्स् ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Aamir khan birthday 
Aamir khan birthaday

Web Title: marathi news entertainment aamir khan birthday instagram first post mother photo