दाऊदचा साथीदार फारुख टकलाला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

नवी दिल्ली -  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार फारुख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. दुबईहून परत आणताच पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली असून, फारुख टकलाला दुपारी टाडा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यासिर मन्सूर मोहम्मद फारुख असे त्याचे पूर्ण नाव असून तो अंडरवर्ल्डमध्ये फारुख टकला नावाने ओळखला जातो. 'डी कंपनी'ची दुबईतील जबाबदारी त्याच्याकडे होती, असे म्हणतात. फारुख टकलाला दुबईतून ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा त्याला दिल्लीत नेण्यात आले. तिथून गुरुवारी सकाळी त्याला मुंबईला आणण्यात आले. तेथे मुंबई पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केली. 

फारुख टकला हा दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्वासू साथीदारांपैकी तो एक होता. 1993च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचा देखील सहभाग होता. मुंबईतील 1993मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर फारुख टकला भारतातून पळून गेला होता. 1995मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती.   

Web Title: marathi news Farooq Takla Mumbai blasts accused dawood ibrahim