गौरी लंकेश हत्या : 'ते' आक्षेपार्ह्य ट्विट गायब

टीम ई सकाळ
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून सोशल मीडियात, विशेषतः ट्विटरवर सुरू असलेल्या वाद-विवादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढले गेले आहे. मोदी ज्या निवडक कार्यकर्त्यांना, तरूणांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यांनी लंकेश यांच्या हत्येनंतर आक्षेपार्ह्य ट्विट केली आहेत, त्यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी विचाराच्या ट्विटर युजर्सनी मोदी आणि या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविले आहे. 

निखील दधिच या सुरत (गुजरात) येथील ट्विटर युजरने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर 'एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहे है।' अशा विखारी भाषेत ट्विट केले.

या युजरच्या प्रोफाईलवर 'Honored To Be Followed By PM Sh. @narendramodi Ji' असे लिहिले आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी या भाषेचा समाचार घेतानाच, 'मोदी ज्यांना फॉलो करतात, त्यांचे विचार वाचा' असे ट्विट केले.

त्यामुळे उठलेल्या गदारोळानंतर दधिच याने हे ट्विट ट्विटरवरून काढून टाकले आहे. मात्र, आपण गौरी लंकेश यांना उद्देशून हे ट्विट केले नव्हते, अशी सारवासारव केली आहे. 

मोदी ज्या निवडक कार्यकर्त्यांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यापैकी अनेकांनी उघडपणे गौरी लंकेश यांच्या हत्येवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करणाऱयांना विरोध दर्शविला आहे. संघाची बाजू घेणारी ट्विटस् यापैकी अनेकांनी रिट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Web Title: Marathi News Gaur Lankesh murder Twitter controversy