गोव्यात कार्निव्हलची धूम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पणजी : गोव्यात आजपासून कार्निव्हलची धूम सुरू झाली आहे. राजधानी पणजीत 'किंग मोमो'चे राज्य सुरू झाले आहे.

'खा, प्या आणि मजा करा', असा संदेश देत 'किंग मोमो'ने कार्निव्हल सुरू झाल्याचे जाहीर केले. पणजीत येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

Goa Carnival 2018
(छायाचित्र : संदीप देसाई)

ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. यंदा पणजीऐवजी जवळच असलेल्या मिरामार येथे कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक संदेश देणारे चित्ररथ लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

Goa Carnival 2018
(छायाचित्र : संदीप देसाई)

Goa Carnival 2018
(छायाचित्र : संदीप देसाई)

Goa Carnival 2018
(छायाचित्र : संदीप देसाई)

पोलिसांनीही यावेळी प्रथमच अंमली पदार्थ तसेच गैरव्यवहारांविरुध्द जागृती करणारा चित्ररथ सादर केला आहे. विदेशी पर्यटकांची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत आहे. राज्यातील मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा या ठिकाणी तसेच यंदापासून मोरजी आणि कुडचडेत कार्निव्हलचे आयोजन पर्यटन खात्याने केले आहे. पुढील चार दिवस कार्निव्हल चालणार आहे. 

कार्निव्हल साजरा करण्यास राष्ट्रप्रेमी नागरिकांचा आक्षेप असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: marathi news Goa Carnival 2018 begins