'हो आम्ही बिअर पितो',महिलांचा पर्रिकरांवर निशाणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पणजी - एका युवा संमेलनात युवकांशी संवाद साधताना (शुक्रवार) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनेतबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी मुलींनी देखील दारु प्यायला सुरुवात केली आहे, याची भिती वाटत असल्याचे पर्रीकर म्हणाले होते. परंतु, असे वक्तव्य करणे पर्रिकर यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून, #GirlsWhoDrinkBeer हा हॅशटॅग वापरुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर महिला आणि तरुणी पोस्ट करत आहेत. ''हो आम्ही बिअर पितो'' असे या मुलींनी सांगितले आहे.

ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे.

Web Title: marathi news goa manohar parrikar #GirlsWhoDrinkBeer