भाजपने 'पप्पू' म्हणू नये - निवडणूक आयोग

वृत्तसंस्था
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अहमदाबाद : भाजपच्या वतीने करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातीमध्ये 'पप्पू' शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. 'पप्पू' हा शब्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून वापरला जात आहे. 

राहुल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून 'पप्पू' हा शब्द सध्या मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. दरम्यान, जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने मागील महिन्यात  जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्यामधील 'पप्पू' हा शब्द मानहानीकारक असल्याचे सांगत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील प्रसारमाध्यम समितीने या शब्दावर आक्षेप घेतला.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

    Web Title: marathi news gujarat election commission bars bjp advt saying pappu